रायगड - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे गावागावात भीतीचे वातावरण पसरले आहे. माणगाव तालुक्यातील कुशेडे गावात आज एकाच दिवशी 5 जणांना कारोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात 2 महिला, 2 पुरूष आणि एका 8 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्यामुळे कुशेंडे गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे.
रायगडच्या कुशेडे गावात एकाच दिवशी 5 जण कोरोनाबाधित; गावातील रुग्णसंख्या ६ - raigad corona update
कुशेडे गावात आज एकाच दिवशी 5 जणांना कारोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात 2 महिला, 2 पुरूष आणि एका 8 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्यामुळे कुशेंडे गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले असून हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे.
दरम्यान, 12 मे रोजी मुंबईतील कांदिवलीहून हे कुटुंब एकाच गाडीतून गावी आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल 14 मे रोजी आला होता. त्यानंतर 16 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्याचे अहवाल आले असून त्यात 5 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.
कुशेंडे गावात अजून पाच जण कोरोनाबाधित सापडल्यानंतर आता आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून आरोग्य यंत्रणेसह महसूल प्रशासन कामाला लागले आहे. आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या आणखी व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईतून गावी येणाऱ्या चाकरमानी नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.