रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील लाखपाले गावाजवळ मंगळवार (दि.4) सायंकाळी एक भले मोठे झाड उन्मळून पडले. परिणामी या मार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावर झाड पडल्याची माहिती मिळताच महामाार्ग प्राधिकरण पोलीस यांच्याकडून युद्धपातळीवर काम करून झाड हटवण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावर लाखपाले गावाजवळ झाड उन्मळून पडले - heavy rain
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर लाखपाले येथे झाड उन्मळून पडले. या झाडाचा काही भाग बाजूला असलेल्या एका घरावर पडून घराचे नुकसान झाले. मात्र प्रसंगावधान दाखवून घरातील लोकांनी बाहेर पळ काढला आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.

महामार्गावर पडलेले झाड पडल्याने मात्र चार तासापासून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान रायगड जिल्ह्यात आज ही मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.