महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानसरोवर बस थांबा प्रवाशांसाठी झालाय डोकेदुखी - Panvel

मानसरोवर बस स्थानकात भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

problem

By

Published : Feb 5, 2019, 2:24 PM IST

पनवेल - मानसरोवर रेल्वे स्टेशन समोरच्या बस स्थानकात भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे बसस्थानक प्रवाशांसाठी डोकेदुखी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पनवेलच्या कामोठे आणि कळंबोली वसाहतीमधील नागरिकांसाठी मानसरोवर रेल्वे स्टेशन समोर एनएनएमटीचा बस थांबा उभारण्यात आला आहे. पण हा बस थांबा प्रवाशांसोबत एनएमएमटीच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील गैरसोयीचा ठरतोय. या ठिकाणी बस फेर्‍यांचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची निवारा व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात सगळीकडे केर-कचरा साचलेला असल्यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.


एनएनएमटी वाहतूक विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, हा पैसा जातो कुठे? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून होत आहे. या परिसरातील कचऱ्यामुळे होणाऱ्या डासांपासून बचाव करण्यासाठी एनएमएमटीच्या कर्मचारी अक्षरशः कचरा जाळून स्वतःचा बचाव करत आहेत. मानसरोवर स्थानकात कर्मचाऱ्यांना शौचालयासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
या स्थानकावर असलेल्या गैरसोयी दूर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत. पण संबंधित प्रशासकीय यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details