रायगड - जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात वनविभागाने खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. तसेच 2 खवले मांजर आणि 2 मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी इतर काही जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेल्या खवल्या मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत आहे.
आणि तस्कर वन विभागाच्या जाळ्यात
वन विभागाला मिळालेल्या खबरीनुसार सुधागड नवघर येथे दोन व्यक्ती खवले मांजर विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक संजय कदम आणि सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी नवघर येथे सापळा रचला होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अडुळसे ते जांभूपाडा रोडवर दोन संशयित मोटरसायकलवर आले. आणि वन विभागाच्या जाळ्यात फसले.