रायगड-मुंबई पुणे महामार्गावर दोन वाहनांच्या धडकेत कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना मध्यरात्री घडली. या अपघातात पोलीस हवालदार सचिन सोनवलकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दोन वाहनांच्या धडकेत वाहतूक पोलीस कर्मचारी ठार - मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस हवालदार सचिन सोनवलकर हे मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी पुढे चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या एका कंटेंनरने धडक दिली. आणि अपघात झाला. यात दुर्दवाने सचिन सोनवलकर यांना आपला जीव गमवावा लागला.
मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस हवालदार सचिन सोनवलकर हे मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी पुढे चाललेल्या ट्रकला मागून येणाऱ्या एका कंटेंनरने धडक दिली. आणि अपघात झाला. यात दुर्दवाने सचिन सोनवलकर यांचा मृत्यु झाला.
मुंबई-पुणे महामार्गावर एखादा अपघात झाला की सचिन सोनवलकर हे वाहतूक सुरळीत करीत होते. मात्र आज त्यांनाच अपघातात आपला जीव गमवावा लागला. सचिन सोनलकर यांच्या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि सोनवलकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. महामार्ग वाहतूक विभागाचे ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.