रायगड -नाताळ आणि ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक कोकणात जात आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून पेण ते वडखळ दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. ही कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक
नाताळाच्या सुट्ट्या आणि ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
गोव्यामध्ये नाताळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी अनेक ठिकाणाहून पर्यटक गोव्यामध्ये येत असतात. तसेच कोकणात सर्वाधिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटक नाताळाच्या सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी कोकणात गर्दी करीत असतात. तसेच ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी देखील कोकणात पर्यटक येत असतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.