रायगड- समुद्रावर वायू चक्रीवादळचा प्रभाव १५ जूनपर्यंत राहणार आहे. या दरम्यान समुद्र किनारी भीषण वादळी वारे वाहणार आहे, असा इशारा कोस्टगार्ड विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असतानाही अति उत्साही पर्यटकांकडून या सुचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
'वायू'च्या प्रभावाने समुद्र किनाऱयावर जाण्यास बंदी; पर्यटकांचा मात्र कानाडोळा - पर्यटक कानाडोळा
समुद्रावर वायू चक्रीवादळचा प्रभाव १५ जूनपर्यंत राहणार आहे. या दरम्यान समुद्र किनारी भीषण वादळी वारे वाहणार आहे, असा इशारा कोस्टगार्ड विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असतानाही अति उत्साही पर्यटकांकडून या सुचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वायू चक्रीवादळ हे गुजरातकडे वळले नसून समुद्रा मध्ये घोंघावत आहे. त्यामुळे याचा परिणाम समुद्र किनारी पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनारी वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र खवळलेला राहणार असून याचा परिणाम १५ जूनपर्यंत पाहायला मिळणार असल्याची सूचना इंडियन कोस्ट गार्ड मुरुड यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने मच्छीमार, पर्यटक व नागरिकांना समुद्रात पोहण्यास व मासेमारी करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
आपत्कालीन परिस्थिती असल्याने समुद्र किनारी आवश्यक पोलीस बंदोबस्त व बचाव साहित्य उपलब्ध करावे. अशा सूचना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात असताना अति उत्साही पर्यटक मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.