महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोहा : मुंबईचे तीन तरुण कुडंलिका नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू - रेस्क्यू टीम

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते.  त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले.

मृतदेहांचे शोध घ्यायला निघालेली रेस्क्यू टीम

By

Published : Jun 16, 2019, 7:43 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:15 PM IST

रायगड - मुंबई येथील तीन तरुण रोहा तालुक्यातील बल्ले चिंचोली गावातील कुंडलिका नदी पात्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोध मोहिमेत दोघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकाचा शोध अद्याप सुरू करण्यात आले होते. दरम्यान, संध्याकाळ झाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईचे तीन तरुण कुडंलिका नदीत बुडाले; दोघांचे मृतदेह सापडले.

महेश अरुण जेजुरकर (वय 39), परेश अरुण जेजुरकर (वय 35), अक्षय शालिग्राम गणगे (वय 29) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. यामध्ये अक्षय आणि परेश या दोन मित्रांचा मृतदेह सापडले आहेत. तर एकाचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी दाखल झालेले पोलिस

रोहा तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संकेत पवार हे मुंबईहून आपल्या काही मित्रांसह गावी आले होते. त्यानंतर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संकेत पवार हे महेश जेजुरकर, परेश जेजुरकर, अक्षय गणगे यांच्यासह अन्य मित्रांबरोबर गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदी पात्रात पोहण्यास गेले. त्यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महेश, परेश व अक्षय हे तिघे बुडाले. त्यावेळी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सोबत आलेल्या मित्रांनी केला. मात्र, त्यांना अपयश आले.

मृतदेहांचे शोध घ्यायला निघालेली रेस्क्यू टीम

कुंडलिका नदी पात्रात तीन जण बुडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तसेच रेस्क्यू टीमहीने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले होते. त्यांना २ मृतदेह शोधण्यात यश आहे आहे.

Last Updated : Jun 16, 2019, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details