महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात 'रॅपिड अँटीजेन टेस्ट', तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह

आज (दि. 29 जुलै) रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे दोनशेहून अधिक जणांची रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी व एका कर्मचाऱ्याची आई, अशा तिघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

raigad news
raigad news

By

Published : Jul 29, 2020, 6:34 PM IST

रायगड - कोरोनाची लागण आहे की नाही, याबाबत करण्यात येणारी रॅपिड अँटीजेन टेस्ट आज (दि. 29 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांमार्फत करण्यात आली. यावेळी दोनशेहून अधिक शासकीय कर्मचारी, पत्रकार यांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी आणि त्यापैकी एकाची आई, असे तीन जणांची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. या तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूची लागण आपल्याला झाली आहे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. आपल्याला कोरोना होऊ नये, अशी सगळ्याची भावना असून यासाठी प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. कोरोनाची लागण आपल्याला झाली आहे का याबाबत स्वॅब तपासणी केली जाते. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कोरोना लागण झाली आहे का हे एका दिवसात कळते. रॅपिड अँटीजेन टेस्ट मार्फ़त कोरोना बाधा झाली आहे का हे केवळ अर्ध्या तासात समजते. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रॅपिड अँटीजेन तपासणी किटची उपलब्धता करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचारी हे कामानिमित्त कार्यालयात नेहमी येत असल्याने रोज अनेकांशी त्याचा संपर्क होत असतो. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना सांगितले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी यांनी ही तपासणी करून घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. गजानन गुंजकर, लॅब टेक्निशियन फिरोज पल्लवकर, गणेश सुतार यांनी ही तपासणी केली.

‘अशी’ केली जाते रॅपिड अँटीजेन टेस्ट

तपासणी करणाऱ्या व्यक्तीच्या नाकपुडीत नळी टाकून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर तो स्वॅब एका छोट्या बाटलीत घेऊन चाचणी केली जाते. त्या पट्टीमध्ये स्वॅबचे दोन तीन थेंब टाकले जातात. यामध्ये दोन लाल रंगाच्या रेषा असून दोन्ही रेषा या लाल झाल्यास कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होते. तर एकच रेषा लाल झाली असेल तर तो व्यक्ती निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न होते. अर्ध्या तासात आपण निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह हे कळले जाते. ही टेस्ट आता खासगी रुग्णालयातही केली जाणार असून नागरिक स्वतः जाऊनही ही टेस्ट करून कोरोना झाला की नाही याची खातरजमा करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details