महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परदेशी महिलांचा विनयभंग करणाऱ्या म्हसळ्यातील दोन आरोपींना अटक; एक आरोपी अल्पवयीन - Crime

चिली येथील पर्यटक महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना 6 जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेतील दोन आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी रात्री अटक केली आहे.

श्रीवर्धनमध्ये परदेशी महिलेचा विनयभंग

By

Published : Jun 8, 2019, 1:07 PM IST

रायगड - अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असताना श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या चिली येथील पर्यटक महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना 6 जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेतील दोन आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी रात्री अटक केली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


रायगडमधील समुद्राचे व निसर्गाचे आकर्षण असल्याने परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. श्रीवर्धन समुद्र किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पर्यटनस्थळ म्हणून जागतिक पातळीवर श्रीवर्धनची ओळख आहे. परंतु श्रीवर्धनमध्ये पर्यटक सुरक्षित नसल्याच्या विविध घटना घडत आहेत.


चिली देशाच्या दोन पर्यटक महिला श्रीवर्धनमध्ये पर्यटनास आल्या होत्या. 6 जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्याच्या आसपास परदेशी महिला पर्यटक बाजारामधून खरेदी करून नारायण पाखाडीमधून त्यांच्या हॉटेलजवळ जात होत्या. यावेळी आरोपी रफिश दफेदार आणि महंमद कैफ यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन करून त्याना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला.


त्यानंतर सदर महिला पर्यटकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाजारात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींविरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात भा. द. वी. कलम 354, 354 ड, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. एस. जाधव करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details