रायगड - खोपोली नगरपरिषद हद्दीतील मिलगाव आदिवासी कातकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यात नाल्यावर खोपोली नगरपरिषदेकडून आठ ते दहा महिन्यांपूर्वी पुल बांधण्यात आला होता. ठेकेदाराने दुसऱ्या सब ठेकेदाराला पुलाचे काम दिले आणि त्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हे बांधकाम केल्याने पूल खचला आहे. दोन दिवस सतत पाऊस पडल्यामुळे पहिल्याच पावसात नवीन बांधलेला पूल वाहून गेला आहे.
खोपोली-मिलगाव आदिवासीवाडीला जाणारा पुल खचला, आदिवासींचे हाल - रायगड पूल
खोपोली नगरपरिषद हद्दीतील मिलगाव आदिवासी कातकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यात नाल्यावर खोपोली नगरपरिषदेकडून आठ ते दहा महिन्यांपूर्वी पुल बांधण्यात आला होता. ठेकेदाराने दुसऱ्या सब ठेकेदाराला पुलाचे काम दिले आणि त्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हे बांधकाम केल्याने पूल खचला आहे.
ठेकेदारावर कारवाई होणार का ?
खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक या ठिकाणी वाहून गेलेल्या पूलाकडे लक्ष देणार का ? असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे.
ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम -
मिलगाव आदिवासी कातकरीवाडी ही शिळफाट्यापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब असून या आदिवासी बांधवांना बाजार खरेदी, दवाखाना, मोलमजुरीसाठी याच पुलावरून पायी प्रवास करावा लागतो. स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधारातून प्रवास करावा लागतो. वाहून गेलेल्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवल्यास जीवितहानी होण्याची भीती आहे. या पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून पुन्हा त्याच खर्चाने पूल बांधून घेण्याची मागणी येथील आदिवासी बांधव करीत आहेत.