रायगड- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केला असल्याचा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील आरोपांचे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी खंडन केले आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी आपल्या घरी पत्रकारांना माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात जाहीर सभा सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला असून आरोप प्रतिरोपाच्या फैरी एकमेकांवर केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एका जाहीर सभेत विराट आयएनएस या युद्धनौकेचा कौटुंबिक सहलीसाठी वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशभरात खळबळ माजली आहे.