रायगड- कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची कन्या अदिती तटकरे यांनीही आपला उमेदवारी अर्ज यावेळी सादर केला.
आघाडीचे उमदेवार सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज - Appasaheb Dharmadhikari
अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनीनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराज व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन घेतले.
सुनील तटकरे अर्ज दाखल करताना
सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराज व निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दर्शन घेतले. आरडीसीसी बँकेच्या समोरच्या पटांगणात आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा आटोपल्यानंतर तटकरेंनी अलिबाग येथे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे अर्ज सादर केला.अर्ज दाखल करताना काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार मीनाक्षी पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप उपस्थित होते.