रायगड- शासनाने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्याच्या राज्यात, गावात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परराज्यातील नागरिक हे आपल्या गावी जायला मिळणार म्हणून आनंदित झाले असून कागदपत्र आणि वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी करू लागले आहेत.
गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांची धडपड; कागदपत्र, वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी - रायगडात अडलकेल्या मजुरांची घरी जाण्यसाठी गर्दी
जिल्हा सामान्य रुगणालायत वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या असून येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत.
stranded worker in raigad are waiting in Queue
जिल्हा सामान्य रुगणालायत वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या असून येथे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. रुग्णालय तसेच पोलीस प्रशासन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत.
परराज्यातील नागरिकांना प्रशासनामार्फत त्यांच्या गावी सोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, या नागरिकांच्या अति उत्साहीपणाचा ताप हा पोलीस तसेच रुग्णालय प्रशासनाला सहन करावा लागत आहे.