रायगड- कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा पावले उचलत आहेत. स्थानिक प्रशासन असलेल्या अलिबाग शहराला लागून चेढंरे ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील 198 सोसायट्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे. जिल्हा प्रशासनासोबत स्थानिक प्रशासनही नागरीकांची आरोग्यासाठी पावले उचलत आहे. तर बाहेरुन आलेल्या व्यक्तिची माहिती कळविण्याचे आवाहन प्रसासनाने केले आहे.
अलिबाग शहराला लागून असलेल्या चेढंरे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात हौसिंग सोसायट्या आहेत. कोरोनाची लागण नागरीकांना होऊ नये यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सोसायट्या निर्जंतुक करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुक्तीसाठी 198 हौसिंग सोसायटी मधील मोकळ्या जागा, जिने व आवारामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. तसेच आजूबाजूच्या परिसरातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, दुध डेअरी व सर्व एटीएम सेंटर याठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.