रायगड - डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागच्या किहीम येथील रुप्पन्या बंगला आज जमीनदोस्त करण्यात आला. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, महसूल, बांधकाम अधिकारी, कर्मचारीही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. सुरक्षिततेची काळजी म्हणून परिसरातील १०० मीटर पर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला होता. तसेच या परिसरात वाहनांनाही बंदी करण्यात आली होती.
नीरव मोदीच्या साम्राज्याला सुरुंग, डायनामाईट लावून बंगला केला जमीनदोस्त
स्फोटक तज्ज्ञांनी बंगल्यातील ३० पिलरला स्फोटक भरून वायरींग केली. त्यानंतर स्फोट घडवून हा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला. यासाठी रात्रीपासूनच काम सुरू होते.
डायनामाईट लावून बंगला उद्ध्वस्त करताना
स्फोटक तज्ज्ञांनी बंगल्यातील ३० पिलरला स्फोटक भरून वायरींग केली. त्यानंतर स्फोट घडवून हा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला. यासाठी रात्रीपासूनच काम सुरू होते. उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. नीरव मोदीचा बंगला स्फोटकांनी उडवल्यानंतर काही सेकंदात पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे अलिबाग किहीममधील 'नीरव मोदी पुराण'बंद झाले आहे. तसेच मोदीचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.