महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला; शेकापचा धुव्वा उडवत महेंद्र दळवी विजयी - PWP

अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पहिल्यांदाच विजय मिळाला. सेनेचे महेंद्र दळवी यांनी 32 हजार 611 मताने विजयी झाले. त्यांनी शेकापचे विद्यमान आमदार सुभाष पाटील यांचा पराभव केला. अलिबाग हा शेकापचा गड मानला जातो. शेकापने येथून 9 वेळा विजय मिळवला होता.

महेंद्र दळवी

By

Published : Oct 24, 2019, 5:37 PM IST

Updated : Oct 24, 2019, 11:42 PM IST

रायगड- अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. महेंद्र दळवी यांना 111047 मते मिळवली तर शेकापचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) पाटील यांना 78086 मते मिळाली असून त्यांचा 32611 मताने पराभव केला. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर यांना 11853 तर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांना फक्त 2511 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी महेंद्र दळवी विजयी झाल्याचे घोषित केले. महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर अलिबाग तालुका हा भगवामय झाला असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले होते.

शिवसेनेने अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला
अलिबाग येथील नेहुली क्रीडा संकुल मध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी मतांमध्ये आघाडी घेतली. शेवटच्या 27 फेऱ्यांपर्यत दळवी यांना भेटलेल्या मताची आघाडी शेकापच्या सुभाष पाटील यांना एकदाही तोडता आली नाही. शेकापच्या 30 वर्षाच्या सत्तेला शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी सुरुंग लावला आहे. अलिबाग मुरुडमधील मतदारांनी शेकाप बद्दल असलेली नाराजी मतपेटीद्वारे व्यक्त केली आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे करण्यात शेकापचे विद्यमान आमदार सुभाष पाटील हे अपयशी ठरले होते. याचा फटका त्यांना बसला.

अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा 1952 पासून शेकापचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने 4 वेळा तर शेकापने 9 वेळा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. शिवसेनेला या मतदारसंघात एकदाही विजय संपादन करता आला नव्हता. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना 16 हजाराने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी 32 हजाराचे मताधिक्य घेऊन दळवी हे विजयी झाले. विजयानंतर महेंद्र दळवी यांची भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. बऱ्याच वर्षांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकावर विधानसभेचा गुलाल अंगावर उडाल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे

Last Updated : Oct 24, 2019, 11:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details