महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एनडीए सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार, अनंत गीते यांना विजयाची खात्री - अनंत गीते

लोकसभा निवडणुकीत १० लाख २० हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्याचे आभार मानण्यासाठी आभार मेळावे घेतले होते. त्यामुळे मतमोजणी झाल्यानंतरही पुन्हा मतदारसंघात सक्रिय राहणार आहे, असे अनंत गीते यांनी सांगितले.

एनडीए सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार, अनंत गीते यांना विजयाची खात्री

By

Published : May 22, 2019, 3:54 PM IST

रायगड- रायगड लोकसभा निवडणुकीत मतदार हे माझ्या बाजूनेच कौल देणार असून पुन्हा एकदा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजप सरकारमध्ये पुन्हा मंत्री म्हणून काम करणार असल्याचेही गीते यांनी सांगितले.

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून त्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याशी केलेली बातचीत...

२३ मे रोजी मतमोजणी असून आपल्याला विजयाची खात्री कितपत आहे याबाबत विचारले असता, माझा विजय निश्चित असून प्रचंड मताधिक्याने मी निवडून येणार आहे. मतदारांनी यावेळीही मलाच मतदान केले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात दोन वेळा पूर्ण मतदारसंघ फिरून झाला. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार केला. त्यावेळी मतदारांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता, असे मत गीते यांनी सांगितले.

एनडीए सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार, अनंत गीते यांना विजयाची खात्री

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप अशी आघाडी झाली होती. त्यामुळे ३ पक्ष एकत्र आल्याने ही निवडणूक मला जड जाणार असल्याचा प्रचार विरोधकांकडून होत आहे. मात्र, ही फक्त नेत्याची आघाडी झाली असल्यामुळे विजय हा माझाच होणार असा ठाम विश्वास अनंत गीते यांनी सांगितले.
एक्झिट पोलनुसार एनडीए सरकार सत्तेत येणार असल्यामुळे पुन्हा तुम्हाला मंत्रिपदाची संधी मिळणार का? यावर अनंत गीते यांनी पुन्हा भाजप सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत निर्णय घेतील असेही ते म्हणाले.

मतदान झाल्यानंतर महिनाभर आपण काय केलेत यावर गीते म्हणाले की, मी कुठेही बाहेर गेलो नाही. मंत्रालयात जाऊन काम करीत होतो. तर मुंबईत असताना मंत्रालयातील फाईलची कामे करीत होतो. तसेच मतदारसंघात होतो. लोकसभा निवडणुकीत १० लाख २० हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्याचे आभार मानण्यासाठी आभार मेळावे घेतले होते. त्यामुळे मतमोजणी झाल्यानंतरही पुन्हा मतदारसंघात सक्रिय राहणार आहे, असे अनंत गीते यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details