महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्हा परिषदेतील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेमध्येही नागरिक कामानिमित्त येत असल्याने कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात 231 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून यामध्ये शिक्षण विभागातील 3, सामान्य प्रशासन 3 तर आरोग्यमधील 1 असे सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्हा परिषदेत सात जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह
जिल्हा परिषदेत सात जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Aug 7, 2020, 5:13 PM IST

रायगड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण हे चांगले आहे. कोरोना विषाणू लागण झाली की नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने शासकीय कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्हा परिषदेतही 231 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असून यामध्ये सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद कार्यालय हे निर्जंतुक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा बारा हजार पार झाला आहे. शासकीय कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, जिल्हा सामान्य रुग्णालय या कार्यालयात कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयातही कोरोना लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

अलिबाग हे मुख्यालयाचे ठिकाण असून कामानिमित्त नागरिक हे शासकीय कार्यालयात येत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी संपर्क येत असतो. जिल्हा परिषदेमध्येही नागरिक कामानिमित्त येत असल्याने कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यात 231 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून यामध्ये शिक्षण विभागातील 3, सामान्य प्रशासन 3 तर आरोग्यमधील 1 असे सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सातही जणांवर उपचार सुरू आहेत. तर, सात रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषद कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details