महाराष्ट्र

maharashtra

जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट सुरू..

By

Published : Jun 17, 2019, 6:50 PM IST

दोन महिन्याची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज शाळेमध्ये पुन्हा चिवचिवाट सुरू झाला आहे. शाळेचा पहिला दिवस असल्याने पालक वर्ग आपल्या पाल्ल्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी लगबग केली. शासकीय शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ११ लाख ३५ हजार ११९ मोफत पुस्तके मिळणार असून जिल्ह्यातील ३२७१ शाळेतील २ लाख ३० हजार ७४१ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

विद्यार्थ्यांचे पुस्तक देउन शाळेत स्वागत करतांना अधिकारी

रायगड- दोन महिन्याची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज शाळेमध्ये पुन्हा सुरू झाला आहे. शाळेचा पहिला दिवस असल्याने पालक वर्ग आपल्या पाल्ल्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी लगबग करीत होते. तर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थीही उत्साहाने शाळेत येत होते. नव्यानेच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही कुठे हसू तर कुठे रडू दिसत होते.

पाल्यांना शाळेत नेतांना पालक


शाळेच्या पहिल्याच दिवशी ३२७१ शाळेतील २ लाख ३० हजार ७४१ विद्यार्थ्यांना आज शासनातर्फे मोफत पुस्तके देण्यात आली.


एप्रिल महिन्यात परीक्षा संपून आज १७ जानेवारी रोजी जिल्ह्यात शाळा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न झाले होते. खासगी शाळेसह शासकीय शाळाही आज विद्यार्थ्यांनी भरून गेल्या होत्या. शाळा सुरू झाल्याने मुलांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनही सज्ज झाले होते. जिल्हा परिषद व नगरपालिका शाळामध्येही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी स्वतःहून पहिल्या दिवशी शाळेत जाऊन मुलांचे स्वागत केले.


शाळा सुरू झाल्याने नवे दप्तर, नवी पाठ्यपुस्तके, नवे वर्ग पाहून मुलांमध्येही कुतुहल निर्माण झाले होते. शासकीय शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना ११ लाख ३५ हजार ११९ मोफत पुस्तके मिळणार असून जिल्ह्यातील ३२७१ शाळेतील २ लाख ३० हजार ७४१ विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details