महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा; खोपोलीत घरावर कोसळले झाड - 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय' संस्था

खोपोलीतील वासरंग विभागात एका घरावर झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली मात्र, घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

छताचे नुकसान

By

Published : Oct 25, 2019, 11:48 AM IST

रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यापुर्वीच खोपोलीतील वासरंग विभागात एका घरावर झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली. मात्र, घराचे पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

घरावर झाड पडल्याने छताचे नुकसान


शुक्रवारी पहाटे खालापूरमध्ये काही भागात जोरदार वारा सुटला. त्यामुळे रहिवासी वस्ती शेजारी असणारे झाड बाजुच्या घरावर कोसळले. 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय'या संस्थेच्या सदस्यांना ही घटना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर आणि त्यांचे सहकारी, नगरसेवक नितिन मोरे, मंगेश दळवी, किशोर पानसरे यांनी पडलेले झाड घरावरून बाजूला केले.

हेही वाचा -मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी

दरम्यान, रायगड जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवस सर्व आपत्कालीन यंत्रनांणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही दुर्घटना घडल्यास सर्व सेवाभावी संस्थाना तत्काळ मदतीचे आवाहनही करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details