महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून - संपर्क तुटला

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणीचे रस्ते गेले असुन, काही गावांचा संपर्क तुटला आहे.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून

By

Published : Aug 4, 2019, 7:18 PM IST

रायगड - महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड सावरट संदोशीला जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. त्यामुळे संदोशी, सावरट, करमर, आमडोशी, कावळे-बावळे या 6 गावांचा रायगडशी संपर्क तुटला आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते गेले वाहून
तर, पोलादपूर तालुक्यातील कोतवाल व रेहेवाडी हा रस्ता खचल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शिवथरखल येथील रस्त्यावरही दरड कोसळली असल्याने हा रस्ता बंद झालेला आहे.जिल्ह्यात बारा तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. महाड, पोलादपूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पोलादपूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोतवाल व रेहेवाडी या गावाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टमध्ये खचला असून कोतवाल बुद्रुक, कोतवाल खुर्द, रेळेवाडी व कोतवाल बौद्धवादी या गावांचा संपर्क पूर्णत: तुटला आहे. या गावांची लोकसंख्या 2500 च्या जवळपास आहे. पावसाची संततधार कमी न झाल्यास हा रस्ता आणखी खचला जाऊन परिसरातील 100 च्या आसपास झाडे जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details