रायगड- अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शासनाकडून पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पेण पंचायत समिती सभापती पदासाठी शेकापच्या सरीता म्हात्रे तर उपसभापती पदासाठी सुनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली.
पेण पंचायत समिती सभापती सरिता म्हात्रे, तर उपसभापती पदी सुनील गायकरांची बिनविरोध निवड - पंचायत समिती निवडणूक रायगड
पेण पंचायत समिती सभापती पदासाठी शेकापच्या सरीता म्हात्रे तर उपसभापती पदासाठी सुनिल गायकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांनी काम पाहिले.
पेण पंचायत समितीच्या सभापती सरिता म्हात्रे
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पेणच्या तहसिलदार अरुणा जाधव यांनी काम पाहिले. निवड झाल्याबद्दल माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पाटील, डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, सुरेश पाटील यांनी सरीता म्हात्रे आणि सुनिल गायकर यांचे अभिनंदन केले.