महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन, भाजीपाल्यासह मासळी बाजारही राहणार बंद - रायगड लॉकडाऊन

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत नागरिकांमध्ये मागणी वाढू लागली होती. लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यलयात राजस्व सभागृहात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.

raigad corona update  raigad re lockdown  raigad latest news  रायगड लेटेस्ट न्यूज  रायगड लॉकडाऊन  रायगड पालकमंत्री अदिती तटकरे
'रायगडमध्ये परत दहा दिवसांचे लॉकडाऊन, भाजीपाल्यासह मासळी बाजराही राहणार बंद'

By

Published : Jul 13, 2020, 5:16 PM IST

रायगड - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रायगडात पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. मेडिकल, दूध, फार्मा कंपनी तसेच इतर अत्यावश्यक कंपन्या सुरू राहणार असून काही कंपन्या बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दहा दिवसांच्या या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, मटण, चिकन, मासळी बाजार, किराणा स्टोअरही बंद राहणार असून नागरिकांना होम डिलिव्हरीची सुविधा देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले.

'रायगडमध्ये परत दहा दिवसांचे लॉकडाऊन, भाजीपाल्यासह मासळी बाजराही राहणार बंद'
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत नागरिकांमध्ये मागणी वाढू लागली होती. लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यलयात राजस्व सभागृहात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यात पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सांगितले.15 ते 24 जुलै दरम्यान दहा दिवसांचा हा लॉकडाऊन असून यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच पूर्वीसारखी नाकाबंदी जिल्ह्यात केली जाणार असून पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी आणि जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी ईपास सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. शेती कामांना या लॉकडाऊनमध्ये सूट दिली असली तरी त्यांनीही नियम पाळून कामे करायची आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी अलिबाग येथे कंट्रोल रूम स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती ही संकलीत केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details