महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतफेड करण्यासाठी रजनीकांत फॅन्स पूरग्रस्तांच्या मदतीला

रजनीकांत फॅन्स पूरग्रस्तांच्या मदतीला आले आहेत. त्यांनी सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त बांधवासाठी मदत पाठवली आहे. या मतदीचा टेम्पो नुकताच पूरग्रस्त भागात रवाना झाला.

रजनीकांत फॅन्स पूरग्रस्तांच्या मदतीला

By

Published : Aug 30, 2019, 8:08 AM IST

Updated : Aug 30, 2019, 8:44 AM IST

पनवेल -कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुरामुळे तेथील बांधवांवर मोठे संकट आले. एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. अशा परिस्थितीत या बांधवांसाठी सर्वत्र मदतीचा ओघ सुरू झाला. सगळ्यांचा आवडता सुपरस्टार रजनीकांत नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो. त्यांचा फॅन क्लबही तसाच आहे. रजनीकांतचे पनवेलमधील चाहते हे देखील रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल टाकत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. पनवेलमधील रजनीकांत फॅन्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यानी जमा केलेले कपडे, पांघरुणे, बेडसीट, चादर यासह किराणा सामानामध्ये गव्हाचे पीठ, टूथपेस्ट असे साहित्य भरून टेम्पो सांगली, कोल्हापूरसाठी रवाना झाला. पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन ही मदत केली जाणार असल्याचे रजनीकांतच्या फॅन्सनी सांगितले आहे.

रजनीकांत फॅन्स पूरग्रस्तांच्या मदतीला

हेही वाचा - टायर इन्नरने वाचवले सरकारने बुडवले; नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

राजकारणासोबतच चित्रपट क्षेत्रात मैदान गाजवणारे सुपरडुपर रजनीकांत यांचे अनेक फॅन्स पनवेलमध्ये देखील आहेत. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात संकट आले की तिथल्या नागरिकांसाठी सुपरस्टार रजनीकांत हा त्यांना आधार देण्यासाठी धावून येतोच. त्यांचा हा आदर्श घेऊन त्यांचे फॅन्सही आता महाराष्ट्राच्या संकटकाळात मदतीला धावून आले आहेत. पनवेलमधील रजनीकांत फॅन्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः सांगली, कोल्हापूरमध्ये जाऊन कोणत्या गावात किती मदत हवी आहे, याचा अभ्यास केला आणि त्यानुसार पनवेलमधून दैनंदिन वापरातील वस्तू, अन्न धान्य भरलेला टेम्पो पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आला असल्याचे रजनीकांत फॅन्स असोसिएशनचे सेक्रेटरी शिवकुमार रामचंद्रन यांनी सांगितले.

हेही वाचा - चंद्रकांतदादांनी कधी खुरपं हाती घेतलं असतं तर त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले असते - राजू शेट्टी

दक्षिण भारतातील नागरिक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांनी मराठी भाषेशी आणि मराठी माणसांशी आपली नाळ जुळवून घेतली आहे. आज ते येथील मातीशी इतके एकरूप झाले आहेत की त्यांना आपल्या मातीचाही विसर पडत आहे. रजनीकांत यांचा जन्म बंगलोरमध्ये जरी झाला असला तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या चित्रपटांना भरभरून दाद दिली. त्याचपद्धतीने दक्षिण भारतातून महाराष्ट्रात नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या सर्वाना महाराष्ट्राने प्रेम दिले. या मातीने त्यांना आपलं मानून त्यांचा संभाळ केला. महाराष्ट्राशी ऋणानुबंध या दक्षिण भारतातून आलेल्या नागरिकांचे निर्माण झाले आहेत. स्वतः परप्रांतात असूनही आपण आपल्याहून वाईट स्थितीत असणाऱ्या केरळ मधील पूरग्रस्तांची काळजी घेतली. या बद्दल ते कायम ऋणी असतात. ज्या पंचगंगेने त्यांना आधार दिला तिच्या रौद्ररूपाने आपल्या अन्नदात्या कोल्हापूरवासियावर संकट ओढवले. अशावेळी दक्षिण भारतीय मागे कसे राहतील? महाराष्ट्राच्या ऋणाची परतफेड करण्याची संधी म्हणून त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले आहे.

Last Updated : Aug 30, 2019, 8:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details