महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस - ganesh ferstival in raigad

ऐन गणेशोत्सवात रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात 3 सप्टेंबरपर्यंत एकूण 61316.41 मिमी पाऊस पडला असून सरासरी 3832.28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासांत हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

रायगडात मुसळधार पाऊस

By

Published : Sep 3, 2019, 9:05 PM IST

रायगड- जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ऐन गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मात्र, पडत असलेला पाऊस हा शेतीसाठी उत्तम असल्याचे बोलले जात आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान खात्याने येत्या जिल्ह्यात 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

रायगडमधील पावसाची दृश्ये


2 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन घरोघरी झाले असून सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, रात्रीपासून पावसाने जोरदार सुरुवात केली असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यात सगळीकडे पावसाने सुरुवात केली असल्याने गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तामध्ये हिरमोड झाला आहे. येत्या 24 तासात जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडूनही नदी व समुद्र किनारी गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


जिल्ह्यात 3 सप्टेंबरपर्यंत एकूण 61316.41 मिमी पाऊस पडला असून सरासरी 3832.28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 121.94 टक्के पाऊस पडला आहे. आज 3 सप्टेंबर रोजी उरण तालुक्यात सर्वाधिक 176 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अलिबाग 121 मिमी, पेण 45 मिमी, मुरुड 69 मिमी, कर्जत 20.60 मिमी, खालापूर 7 मिमी, माणगाव 92 मिमी, रोहा 78 मिमी, सुधागड 46 मिमी, तळा 71 मिमी, महाड 40 मिमी, पोलादपूर 43 मिमी, म्हसळा 92 मिमी,श्रीवर्धन 110 मिमी, माथेरान 57 मिमी पाऊस पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details