रायगड :गेल्या दोन महिन्यांपासून रायगडकर गर्मीने हैराण झाले होते. त्यातच यावेळी पाऊस उशिरा येणार, असे हवामान विभागाने सांगितले. राज्यात इतर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. मात्र रायगडमधील जनता यावेळी पाऊस कधी पडणार याची आतुरतेने वाट पाहत होती. दोन तीन दिवसापासून वातावरण ढगाळ झाले होते. मात्र पाऊस काही येत नव्हता. सध्या महाड, पोलादपूरमध्ये पावसाचे आगमन झाल्याने येथील नागरिक आता सुखावले आहेत.
महाड-पोलादपुरात पावसाचे गडागडाटासह आगमन
गेल्या दोन महिन्यापासून रायगडकर गर्मीने त्रस्त झाले होते. हवामान विभागानेही यंदा पाउस उशिरा येण्याचे सांगितले त्यामूळे रायगडकर पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत होते. मात्र दोन तीन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले आणि पावसाचे आगमन झाल्याने येथील नागरिक सध्या सुखावले आहेत.
उन्हाळ्याची झळ सोसून रायगडकर हैराण झाले होते. आज दुपारपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ झाले होते. यातच जिल्ह्यातील महाड परिसरात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या तर पोलादपूर शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यतील इतर तालुक्यातही ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनाने रायगडकर आता सुखावले आहेत.
महाडमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली. पोलादपूर शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागात गडगडटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेले रायगडकर गर्मीने हैराण झाले होते. मात्र आज झालेल्या पावसाच्या सरीने सुखावले.