रायगड- लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य वाटप करण्यासाठी जे.एस.एम कॉलेजमध्ये जिल्हा प्रधासनाकडून प्रक्रिया सुरू आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची पूर्व तयारी पूर्ण - सखी केंद्र
जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात २१७९ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ७ सखी केंद्र आणि १ दिव्यांग मतदान केंद्र आहे.
जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात २१७९ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ७ सखी केंद्र आणि १ दिव्यांग मतदान केंद्र आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस, केंद्रीय राखीव दल तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. दिव्यांग मतदारांसाठीही प्रशासनाकडून सुविधा केलेली आहे. तर, मतदान केंद्रावर रुग्णवाहिकांची देखील सोय करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर कर्मचारी, अधिकारी यांच्याकडे साहित्याचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना पोहचविण्यासाठी एसटी बस, खाजगी वाहनांची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची सुविधाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे.