रायगड - जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना पाणी टंचाईच्या समस्येनेही नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्याच्या बारा तालुक्यातील 331 गावे आणि वाड्यातील 62 हजार 479 नागरिक पाणी टंचाईच्या समस्येत होरपळत आहेत. या नागरिकांना सध्या 33 टँकर आणि 4 विहिरींमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे.
दरवर्षी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी नऊ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर,श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.