रायगड - होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती ही कोरोनाबाधित नाही. त्यांना आरोग्याच्या दृष्टीने 14 दिवस वेगळे ठेवण्यात आलेले असते. त्यांच्याबद्दल द्वेष, मत्सर, तिरस्कार करू नका, त्याच्याशी आपुलकीने वागा, संविधानाच्या विरोधात जाऊन वागू नका. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना दिला आहे.
क्वारंटाईन व्यक्तीशी प्रेमाने वागा, अन्यथा कारवाई करू; जिल्हाधिकारी चौधरींचा इशारा - क्वारंटाईन नागरिकांना त्रास रायगड
मुंबई, पुणे तसेच परराज्यात अडकलेले नागरिक कोरोना काळात आपल्या गावात दाखल झाले आहेत. त्यांना घरात तसेच गावात तयार केलेल्या अलगिकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या व्यक्तींमुळे गावात कोरोनाची लागण होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे.
मुंबई, पुणे तसेच परराज्यात अडकलेले नागरिक कोरोना काळात आपल्या गावात दाखल झाले आहेत. त्यांना घरात तसेच गावात तयार केलेल्या अलगिकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, या व्यक्तींमुळे गावात कोरोनाची लागण होईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे ग्रामस्थ या नागरिकांना त्रास देत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे समाजात कोरोनामुळे एकमेकांत दुजाभाव निर्माण झाला आहे. अशा नागरिकांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्याशी आपुलकीने वागण्याचे आवाहन केले आहे.