रायगड -कोरोना संकट त्यात लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता पेट्रोलने शंभरी गाठली असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणीचे स्वयंपाक घरातील बजेटही कोसळले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने भाज्यांचे भावही आता वाढले जाणार आहेत. केंद्र सरकारने वाढलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत पावले उचलून ही दरवाढ कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
'वाहने चालवायचे की चालत फिरायचे?'
अलिबागेत पेट्रोल 100.05 पैसे तर डिझेल 90.54 पेट्रोल हे शंभरी गाठणार, अशी आशा निर्माण झाली होती. बंगाल निवडणुका असल्याने पेट्रोल हे 97.66 रुपयांपर्यंत काही काळ स्थिर राहिले होते. मात्र निकालानंतर पेट्रोल दर शंभरीकडे जाऊ लागला होता. अखेर आज जिल्ह्यात पेट्रोल शंभरी पार झाले आहे. अलिबागेत आजचा पेट्रोल भाव हा 100.05 रुपये तर डिझेल 90.54 रुपये झाला आहे. त्यामुळे वाहने चालवायचे की चालत फिरायचे असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.