महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अडकलेल्या नागरिकांना घरी पोहचवण्यासाठी रायगड बस प्रशासन सज्ज..! - रायगड राज्य परिवहन महामंडळ

राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील आठही आगारातून नागरिकांना इच्छित स्थळी पोहचविण्याची सुविधा सुरू केली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक अधिकारी अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

Raigad bus administration
अडकलेल्या नागरिकांना घरी पोहचवण्यासाठी रायगड बस प्रशासन सज्ज..!

By

Published : May 9, 2020, 10:11 PM IST

रायगड - लॉकडाऊनकाळात एसटी बस सेवा पूर्णतः बंद असली तरी आता ग्रामीण भागातील ही जीवनवाहिनी असलेली बस जिल्ह्यात अडकलेल्या राज्यातील, परराज्यातील नागरिकांसाठी धावून आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील आणि राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील आठही आगारातून नागरिकांना इच्छित स्थळी पोहचविण्याची सुविधा सुरू केली असल्याची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक अधिकारी अनघा बारटक्के यांनी दिली आहे.

परराज्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी शासन आणि प्रशासन सहकार्य करीत आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत चार ते पाच हजार परराज्यातील नागरिकांना प्रशासनाने रेल्वेने त्यांच्या गावी सुखरूप पोहचविले आहे. राज्य परिवहन महामंडळही अशा कठीण परिस्थितीत मागे राहिले नसून, त्यांनीही परराज्यातील नागरिकांना त्याच्या गावी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील आठही एसटी आगारातील एसटी बसेस तसेच चालक, वाहक आपले कर्तव्य बजावण्यास सज्ज झाले आहेत.

जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नागरिकांना त्याच्या गावी सोडण्यासाठी चोवीस तास सेवा उपलब्ध केली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी प्रवास करू शकतात. यासाठी प्रति किलोमीटर 44 रुपये आणि 50 रुपये अपघात सहाय्यता निधी असा दर राहणार आहे. प्रवाशांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि आपल्या ओळखपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. या अटी आणि शर्ती राज्य परिवहन महामंडळाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू केले आहेत. एसटी बस ही प्रवाशांना घेऊन निघाल्यानंतर शेवटच्या ठिकाणापर्यंत नागरिकांना सोडले जाईल मधल्या कुठल्याही स्थानकावर थांबली जाणार नाही.

ज्या प्रवाशांना एसटी बस सुविधा घायची आहे त्यांनी विभागीय कार्यालय, पेण 8275066400, महाड आगार 0214145 - 222139, अलिबाग आगार 02141 - 222006, पेण आगार 02143 - 252001, श्रीवर्धन आगार 02147 - 222241, कर्जत आगार 9762114558 / 8830396138 / 8999038451, रोहा आगार 02194 - 234447, मुरुड आगार 02144 - 274710 / 8087268061, माणगाव आगार 02140 - 263533 दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details