महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेवदंडा समुद्रकिनारी टेण्ट व्यवसायावर प्रशासनाची कारवाई - रायगड समुद्र पर्यटन न्यूज

रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासनाकडून हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यासाठी रेवदंडा, थेरोडा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी समुद्रकिनारी असलेल्या मलक्षेत्र शासकीय जागेत टेण्ट बीच कॅम्पनिंग व्यवसाय सुरू केला आहे. शनिवार, रविवार मोठ्या संख्येने या टेण्ट बीच कॅम्पनिंगचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक हे रेवदंडा समुद्रकिनारी येत असतात. मात्र, महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून यावर अनधिकृत व्यवसायाचा ठपका ठेऊन कारवाईचा बडगा उचलला आहे.

Raigad Revdanda Beach Tent Business News
रायगड रेवदंडा समुद्रकिनारा टेंट व्यवसाय न्यूज

By

Published : Feb 24, 2021, 4:35 PM IST

Updated : Feb 24, 2021, 5:41 PM IST

रायगड - शासन एकीकडे पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात प्रयत्न करीत आहे. समुद्र पर्यटन वाढावे, यासाठी शॅक पॉलिसीही तयार करण्यात आली आहे. असे असूनही रेवदंडा समुद्रकिनारी बीच कॅम्पनिंग व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांवर महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या तक्रारीवरून अनधिकृत व्यवसायाचा ठपका ठेऊन कारवाईचा बडगा उचलला आहे. विशेष म्हणजे, अलिबाग प्रांताधिकाऱ्यांनी पर्यटक टेण्टमध्ये असूनही त्याचे पाणी, वीज कनेक्शन बंद केले. त्यामुळे एकीकडे स्थानिक आपल्या रोजीरोटीसाठी प्रयत्न करीत असताना प्रशासनाची वक्रदृष्टी स्थानिक व्यावसायिकांवर वळली असल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे.

रायगड रेवदंडा समुद्रकिनारा टेंट व्यवसाय न्यूज
रेवदंडा समुद्र किनारा आजही राहिला आहे दुर्लक्षित

अलिबाग तालुक्यात अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, मांडवा, किहीम आणि रेवदंडा हे समुद्र किनारे आहेत. रेवदंडा वगळता इतर समुद्रकिनारे हे पर्यटकांनी नेहमी बहरलेले असतात. रेवदंडा समुद्रकिनारा हा विस्तीर्ण असून सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम आहे. असे असूनही हा समुद्रकिनारा पर्यटनापासून दूर राहिला आहे. त्यामुळे रेवदंडा समुद्र किनारी तुरळक पर्यटक पर्यटनास येत असतात.

रेवदंडा समुद्र किनारा पर्यटन वाढीसाठी होत आहेत प्रयत्न पण..

रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटन वाढीसाठी स्थानिक प्रशासनाकडून हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यासाठी रेवदंडा, थेरोडा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी समुद्रकिनारी असलेल्या मलक्षेत्र शासकीय जागेत टेण्ट बीच कॅम्पनिंग व्यवसाय सुरू केला आहे. शनिवार, रविवार मोठ्या संख्येने या टेण्ट बीच कॅम्पनिंगचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक हे रेवदंडा समुद्रकिनारी येत असतात. किनारी साधारण 45 स्थानिक व्यावसायिक हा व्यवसाय करीत आहेत. यातून रेवदंडा येथील पर्यटन वाढीस वाव मिळू लागला आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीवरून प्रांताधिकारी याची कारवाई

रेवदंडा समुद्रकिनारी शासकीय जागेत स्थानिकांनी पर्यटकांसाठी टेण्ट कॅम्पनिंग व्यवसाय सुरू केला आहे. ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला आहे, ती वाहिवटीची जागा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना समुद्रकिनारी जाताना टेण्टमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी अलिबाग प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच व्यावसायिकांना पाणी विजेचे अनधिकृत कनेक्शन देण्यात आले होते. त्यानुसार प्रांताधिकारी मनीष घोष यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार या व्यावसायिकांचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले आहे. रेवदंडा समुद्रकिनारी चाललेल्या व्यवसायाची रीतसर परवानगीही घेतली गेली नाही. त्यामुळे अनधिकृतपणे हा व्यवसाय सुरू असल्याने ही कारवाई केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

टेण्ट कॅम्पनिंग व्यावसायिकामध्ये संतापाची भावना

रेवदंडा समुद्रकिनारी मच्छीमार तसेच, रेवदंडा स्थानिक सुशिक्षित बेकार तरुणांनी टेण्ट कॅम्पनिंग व्यवसाय सुरू केला आहे. दोन वर्षापासून मच्छीचा दुष्काळ, निसर्ग चक्रीवादळ आणि सुरू असलेल्या कोरोनामुळे स्थानिक टेण्ट कॅम्पनिंग व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र हा व्यवसाय अनधिकृत ठरवून प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यामुळे आम्ही पोट भरायचे कसे, आम्हाला रोजगार द्या किंवा आमच्या व्यवसायासाठी नियमावली तयार करा अशी मागणी या व्यावसायिकाकडून केली जात आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

बीच टेण्ट कॅम्पनिंग व्यवसायासाठी नियमावली बनवल्यास पर्यटन वाढीस येईल बहर

समुद्रकिनारी वाळूच्या सान्निध्यात टेण्टमध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. बीच टेण्ट कॅम्पनिंगसारख्या व्यवसायामुळे पर्यटन बहरण्यास वाव मिळू शकतो. यासाठी शासनाने या व्यवसायासाठी नियमावली बनविणे गरजेचे आहे. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही या व्यवसायातून मिळू शकतात. यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details