महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वेस्टेज प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि डांबरची निर्मिती, रायगडच्या तरूणांनी उभारला प्रकल्प

खराब 100 किलो प्लास्टिक रियाकटरमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करून 30 ते 35 लिटर क्रूड ऑइल तर 25 टक्के प्लास्टिक डांबर तयार होत आहे.

Production of crude oil and Asphalt Using plastic, youths Experiment in raigad
वेस्टेज प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि डांबरची निर्मिती, रायगडच्या तरूणांनी उभारला प्रकल्प

By

Published : Dec 30, 2020, 7:08 PM IST

Updated : Dec 31, 2020, 9:57 AM IST

रायगड - पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत तर काँक्रीट, डांबर रस्ते बांधणीसाठीही करोडो रुपये खर्च शासनाचा होत आहे. यावर उपाय म्हणून अलिबाग तालुक्यातील दोन तरुणांनी विघटन न होणाऱ्या प्लास्टिकपासून पर्यावरणपूरक क्रूड ऑइल आणि प्लास्टिक डांबर डेमो प्रकल्प बनविला आहे. या प्रकल्पात त्यांना यशही आले आहे. सर्वेश पाटील, संकेत जाधव असे या दोन तरुणांची नावे असून रोहित माने आणि प्रसाद मापगावकर यांचीही त्यांना साथ लाभली. सर्वेश आणि संकेत यांनी बनविलेल्या या प्रकल्पाची नाशिक महानगरपालिका आणि जेएसडब्लू सेवाभावी संस्थेनेही दखल घेतली आहे.

वेस्टेज प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि डांबरची निर्मिती...

सर्वेश पाटील आणि संकेत जाधवची संकल्पना

अलिबाग तालुक्यातील मापगाव गावात राहणारा सर्वेश पाटील हा इलेक्ट्रिशन तर संकेत जाधव हा बॉयलर ऑपरेटर आहे. या दोघांनी जगाला भेडसावणारी प्लास्टिक समस्या सोडविण्यासाठी, प्लस्टिकवर प्रक्रिया करून क्रूड ऑइल तयार करण्याची संकल्पना आखली. या संकल्पनेत त्यांना नववी आणि अकरावीत शिकणाऱ्या रोहित माने आणि प्रसाद मापगावकर यांचीही साथ मिळाली. कोरोना आधी त्यांनी ही संकल्पना आखली होती. कोरोनामुळे वेळ मिळाल्याने, चारही तरुणांना कोणतेही इंजिनियर अथवा प्रकल्प तयार करण्याचा अनुभव नसतानाही, आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी हा प्रकल्प उभा केला आहे.

प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि डांबर तयार करणारी टीम...

छोटेखानी उभारला प्रकल्प

सर्वेश आणि संकेत याने प्रकल्प तयार करण्यासाठी आधी कागदोपत्री प्रकल्प तयार केला. मात्र कागदोपत्री प्रकल्प सादर करताना अडचणी येऊ शकतात ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी प्रत्यक्षात छोटेखानी प्रकल्प उभा करण्याचे धाडस केले. त्यानंतर त्यांनी मुंबई कळंबोली येथून प्रकल्प तयार करण्याचे साहित्य आणून सर्वेश याच्या जागेत जोडणी केली. हा प्रकल्प उभा करण्यास दीड ते दोन लाख खर्च आला आहे. प्रयोग यशस्वी करण्यास त्यांना चार महिन्याचा कालावधी लागला.

वेस्टेज प्लास्टिकपासून क्रूड ऑइल आणि डांबर निर्मिती

खराब 100 किलो प्लास्टिक रियाकटरमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करून 30 ते 35 लिटर क्रूड ऑइल तर 25 टक्के प्लास्टिक डांबर तयार होत आहे. क्रूड ऑइल यावर प्रक्रिया करण्याचाही त्याचा मानस आहे. प्रायोगिक तत्वावर क्रूड ऑइल हे सध्या त्यांनी काही मच्छीमार बांधवांना वापरण्यास दिले आहे. प्लास्टिक डांबर हे रस्त्यासाठी वापरले तर टिकावू, मजबूत रस्ते तयार केले जाऊ शकतात. प्लास्टिक डांबरमुळे रस्ता बनविण्यास खर्चही कमी होणार आहे. जिल्ह्यात सध्या प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहे. सर्वेश आणि संकेत यांनी प्लास्टिक समस्येपासून जिल्ह्याला मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याच्या या प्रयोगाची सध्या चर्चा असून शासनानेही या तरुणांच्या प्रयोगाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

शासनाच्या मदतीची हवी साथ

प्लास्टिक कचऱ्याची समस्या नष्ट करण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयोग केला आहे. सध्या हा डेमो प्रोजेक्ट आहे. नगरपरिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद याच्या मार्फत हा प्रयोग शासनस्तरावर राबविण्याचा आमचा मानस आहे. शासनाचा हातभार मिळाला तर भविष्यात रायगड जिल्हा हा प्लास्टिक मुक्त होईल, अशी आशा सर्वेश पाटील, संकेत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details