महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामोठे अपघात : 'त्या' बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

अपघातानंतर या बेदरकार स्कोडा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्याने हा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय होता. अंगावर काटा आणणारे हे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.

By

Published : Jul 23, 2019, 2:39 PM IST

Updated : Jul 23, 2019, 5:57 PM IST

कामोठे अपघात : त्या बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल - कामोठे येथे भरधाव वेगातील कारने सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश होता. याप्रकरणी बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कामोठे अपघात : 'त्या' बेदरकार स्कोडा चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

हरविंदरसिंग हरभजन मटारू (वय ७५ वर्षे) असे या बेदरकार स्कोडा चालकाचे नाव आहे. या अपघातात त्यालाही जखमा झाल्या असून सध्या तो पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात उपचार घेत आहे.
कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात घडला होता. भरधाव वेगातील एका स्कोडा कारने काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी आणि स्कूल बसला धडक दिली होती. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, साधना चोपडे (वय ३० वर्षे), श्रध्दा जाधव (वय ३१ वर्षे), शिफा (वय १६ वर्षे), आशिष पाटील (वय २२ वर्षे) आणि प्रशांत माने हे चार जण जखमी झाले होते.

अपघातानंतर या बेदरकार स्कोडा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्यानं हा 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय होता. अंगावर काटा आणणारे हे चित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. तातडीने पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली असता वाहन चालक उपचारासाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल झाला असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मोटारीची तपासणी केली असता मोटारीत कोणताही बिघाड नसल्याचे उघड झाले आहे. परंतु, चालकाने भरघाव वेगात गाडी का चालवली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jul 23, 2019, 5:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details