रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींसोबत फारूख शेख आणि नितेश सरडा यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. फारूख शेख आणि नितेश सरडा यांना तीन दिवसांपासून कपडेही बदलून दिलेले नाहीत. पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकाबाबत देण्यात आलेली नोटीस ही दिली असली तरी ती नोटीस अद्यापही आम्हाला पोलिसांनी दिलेली नाही. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी फारूख शेख यांना दिलेली नोटीस वकील म्हणून अद्यापही मला देण्यात आलेली नाही. तसेच कारागृह पोलीस आम्हाला आमच्या आशिलाला भेटू देत नाहीत. अजून आमच्या आशिलावर आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे ते आरोपी नाहीत. पोलीस असे का वागतात? असा सवाल फारूक शेख यांच्या वकील निहा राऊत यांनी उपस्थित केला आहे.
4 नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर फारुख शेख आणि नितेश सरडा यांनाही सायंकाळी पोलिसांनी अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिनही जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिघांना अलिबाग शहरातील मराठी शाळेत कोव्हिड सेंटर असलेल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा -अर्णबप्रकरणी आम्हाला राजकारण नको, न्याय द्या - नाईक कुटुंबीय
तीन दिवस आशील एकाच कपड्यावर -