रायगड - महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेबाबत दोषी असलेल्या बांधकाम व्यवसायिक फारूक काझी यांच्यासह चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फारूक काझी हा दुर्घटना घडल्यानंतर फरार झाला आहे. महाड पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी फारूक काझी याच्या मुलाची तळोजा येथे जाऊन चौकशी सुरू केली आहे.
महाड इमारत दुर्घटना: पोलिसांकडून फरार फारूक काझीच्या मुलाची चौकशी - फारूक काझी लेटेस्ट न्यूज
तारिक गार्डन दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. बांधकाम व्यावसायिक फारूक काझी याने निकृष्ट बांधकाम केल्याने ही दुर्घटना घडली. याबाबत बांधकाम व्यावसायिकासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड तसेच अभियंता शशिकांत दिघे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होताच महाड पोलीस फारूक काझी याला पकडण्यासाठी तळोजा येथे त्याच्या राहत्या गेले होते. मात्र, त्याअगोदरच काझी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुलाकडे वडिलांबाबत चौकशी केली. मुलाने चौकशीत काय सांगितले याबाबत माहिती समोर आलेली नाही.