महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खालापुरात तृतीयपंथीयांना खाकी वर्दीकडून मदत

संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर खायचं काय ? असा प्रश्न काही ठिकाणी तृतीयपंथीयांच्या बाबतीत निर्माण झाला. यामध्ये बहुतांश तृतीयपंथी समुदायाचे उदरनिर्वाहाचे साधन हे बाजार मागणेच आहे. अशा बेघर म्हणून जगत असणाऱ्या वर्गाला राहण्यासाठी शाश्वत छप्परच नसल्याने जगण्याचा संघर्ष आणखी तीव्र झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृतीयपंथीयांना येथील पोलीस विभागाने मदत केली.

तृतीयपंथीना खाकी वर्दीकडून मदत
तृतीयपंथीना खाकी वर्दीकडून मदत

By

Published : May 10, 2021, 4:16 PM IST

खालापूर - संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर खायचं काय ? असा प्रश्न काही ठिकाणी तृतीयपंथीयांच्या बाबतीत निर्माण झाला. यामध्ये बहुतांश तृतीयपंथी समुदायाचे उदरनिर्वाहाचे साधन हे बाजार मागणेच आहे. बाजार मागून घरी गेल्याशिवाय दूसरा पर्याय नाही. दरम्यान यामध्ये काही समुदायांना राहण्यासाठी घर देखील नाहीत. अशा बेघर म्हणून जगत असणाऱ्या वर्गाला राहण्यासाठी शाश्वत छप्परच नसल्याने जगण्याचा संघर्ष आणखी तीव्र झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तृतीयपंथीयांना येथील पोलीस विभागाने मदत केली.

यामध्ये पोलीस निरीक्षक अनिल विभूते, उप पोलीस निरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई यांच्या टीमने जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले. या मदतीनंतर तृतीयपंथी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. दरम्यान तृतीयपंथी बांधवांनी खालापूर पोलीस विभागाचे आभार मानले.

तृतीयपंथी बांधवांनी खालापूर पोलीस विभागाचे मानले आभार

जगभरात कोरोना विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या वाढत्या प्राभामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागलेले आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच समाज घटकांची रोजच्या जगण्याची भ्रांत झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तृतीयपंथी समाज येतो. हातावर पोट असल्याने या समाजाची रोजच्या जगण्याची भ्रांत आहे. मात्र, या अडचणीच्या दिवसांत काही मदतीचे हात धावून येतात. याच पार्श्वभूमिवर खालापूर पोलीस विभागाने खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील तृतीयपंथी समाजाला मदतीचा हात दिला. या मदतीने या तृतीयपंथी बांधवाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळाले. यावेळी पोलीस निरिक्षक अनिल विभूते, उपपोलिस निरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई सहपोलिस अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा -बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी व्यापाऱ्याकडे 20 लाखांच्या खंडणीची मागणी, मॉडेल तरुणी गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details