पेण रायगडप्रसिद्ध डॉ मनीष वनगे यांच्या सिद्धीकला हॉस्पिटलकडून पेण पोलीस स्टेशनचे सर्व महिला व पुरुष पोलीस अधिकारी, कर्मचारी व वाहतूक पोलीस यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात प्रत्येक पोलिसांची परीपूर्ण तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबीन, शूगर, एच्.बी.ए.१ सी, बोन डेन्सिटी, ब्लड प्रेशर, वजन, क्लिनिकल तपासणी, ई.सी.जी. इत्यादी तपासणींचा समावेश आहे. औषधेही मोफत देण्यात आली. जनतेचे दिवसरात्र ऊन,वारा, पावसाचा विचार न करता रस्त्यावर सौरक्षण करण्याऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना स्टिलबर्डची चांगल्या प्रतीची फेस शिल्ड भेट देण्यात आली. यांसाठी रोटरी क्लब अॅाफ पेण-ओरायनने विशेष पुढाकार घेतला आहे.
पेण पोलिसांची आरोग्य तपासणी - पेण पोलीस बातमी
रोटरी क्लब प्रेसिडेंट डॉ.सोनाली वनगे यांनी सांगितले की, संपूर्ण पोलीसदल स्वताचा जीव धोक्यात घालून समाजाची काळजी घेत असतात, मात्र त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून आरोग्य तपासणी ही आपलीच बांधीलकी आहे या रोटरीच्या ब्रिदाला अनुसरून हि तपासणी करण्यात आली.
आरोग्य तपासणी ही आपलीच बांधीलकी - यावेळी बोलताना रोटरी क्लब प्रेसिडेंट डॉ.सोनाली वनगे यांनी सांगितले की, संपूर्ण पोलीसदल स्वताचा जीव धोक्यात घालून समाजाची काळजी घेत असतात, मात्र त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे, म्हणून आरोग्य तपासणी ही आपलीच बांधीलकी आहे या रोटरीच्या ब्रिदाला अनुसरून हि तपासणी करण्यात आली. यावेळी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, डॉ. मनीष वनगे, रोटरी क्लब प्रेसिडेंट डॉ.सोनाली वनगे, सेक्रेटरी स्नेहा जोशी, सुबोध जोशी, डॅा.चौधरी, हेमंत शाह उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरात सिध्दकला हॅास्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य होते.