महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश, सिनेसृष्टीतील अभिनेत्रीचाही समावेश - alibaug

राखी व रंजिता यांच्याकडे अनुक्रमे 15 व 11 ग्राम असे 26 ग्राम कोकेन हे अमली पदार्थ आढळले आहे

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश

By

Published : Jun 28, 2019, 9:10 PM IST

Updated : Jun 28, 2019, 9:22 PM IST

रायगड - एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलीसांनी अटक केली आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्‍याची माहिती मिळाली आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश
अलिबागच्‍या किनारपट्टी भागात बर्थडे पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने किनारपट्टी भागातील एका बंगल्याच्या वॉचमनकडून या व्यवसायात असणाऱ्या दलाल राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांचा मोबाईल नंबर घेऊन फोन केला. त्यानंतर त्या दोघींच्या काही रक्कम पोलिसांना दिलेल्या बँक खात्यात भरायला सांगितली. त्यानंतर राखी व रंजिता यांनी युवतीची नावे कळवून सौदा केला व दोन बंगले ऑनलाइनने बुक करायला सांगितले.

स्थानिक गुन्हे पथकाने आपले ग्राहक तयार करून त्यांना बंगल्यावर पाठविले. राखी व रंजिता यांचा मॅनेजर आधीच आलेला होता. बोगस तयार केलेले ग्राहका पैसे देऊन पीडित मुलींना रूममध्ये घेऊन गेले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकांनी पोलिसांना मिस्ड कॉल देऊन इशारा दिला. त्यानंतर स्थानिक गुन्हे पथक पंचासह बंगल्यात दाखल झाले. त्यानंतर महिला पोलीस अधिकारी व पंचांनी मुलीची झडती घेऊन रक्कम जप्त केली. तर राखी व रंजिता यांच्याकडे अनुक्रमे 15 व 11 ग्राम असे 26 ग्राम कोकेन हे अमली पदार्थ आढळले.

स्थानिक गुन्हे पथकाने आज आरोपी व पीडित महिलांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी व पीडित महिला याना न्यायालयात हजर केले असता पीडित मुलींना कर्जत येथील सुधारक गृहात राखवलीसाठी दाखल केले आहे. तर आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये पकडण्यात आलेल्या पीडित मुली ह्या सिनेक्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीतील सेक्स रॅकेटचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Last Updated : Jun 28, 2019, 9:22 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details