महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गेले मॉर्निंग वॉकला.. पोहोचले पोलीस ठाण्यात; खोपोलीत 66 जणांवर कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागरिकांना होऊ नये यासाठी शासन, प्रशासन वारंवार सूचना, आदेश देत आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक हे सर्रास बाहेर पडत असतात. खोपोलीतही पोलीस नागरिकांना बाहेर पडू नका, अशी वेळोवेळी जनजागृती करीत आहेत. मात्र, काही खोपोलीकर हे पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाहीत.

Police action against people  who break lockdown rule in Raigad
मॉर्निंग वॉकला गेले आणि पोलीस ठाण्यात पोहचले, खोपोलित 63 पुरुष आणि 3 महिलांवर पोलिसांची कारवाई

By

Published : Apr 17, 2020, 12:26 PM IST

रायगड - शासन, जिल्हा प्रशासन, पोलीस नागरिकांना 'तुम्ही घरात बसा, बाहेर पडू नका', असे वेळोवेळी आवाहन करत आहेत. मात्र, 'आपल्याला काय होणार' या आवेशाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसतात. अशा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या खोपोलीकरांना पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 63 पुरुष आणि 3 महिलेचा समावेश आहे. गेले होते मॉर्निग वॉकला, मात्र पोहोचले पोलीस ठाण्यात, अशी गत पकडलेल्याची झाली आहे. खालापूर उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे.

मॉर्निंग वॉकला गेले आणि पोलीस ठाण्यात पोहचले, खोपोलित 63 पुरुष आणि 3 महिलांवर पोलिसांची कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नागरिकांना होऊ नये यासाठी शासन, प्रशासन वारंवार सूचना, आदेश देत आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून नागरिक हे सर्रास बाहेर पडत असतात. खोपोलीतही पोलीस नागरिकांना बाहेर पडू नका, अशी वेळोवेळी जनजागृती करीत आहेत. मात्र, काही खोपोलीकर हे पोलिसांना सहकार्य करताना दिसत नाहीत.
सकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या 63 पुरुष आणि 3 महिलांवर खोपोली पोलिसांनी आज कारवाईचा बडगा उचलला. या पकडलेल्या सर्वांना खोपोली पोलिसांनी पोलीस ठाण्यात बसून ठेवले आहे. त्याच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details