रायगड- खालापूर तालुक्याच्या आडोशी गावातील आदिवासी वाडीवर एकाच कुटुंबातील पाच जणांना गावठी अळंबी खाल्याने विषबाधा झाल्याची घटना 20 जुलै रोजी रात्री घडली. रघुनाथ वाघमारे (वय 40), ठमी वाघमारे (वय 35), गणेश वाघमारे (वय 15), ललिता वाघमारे (वय 7), अंकुश वाघमारे या पाच जणांना अळंबी खाल्याने विषबाधा झाली. या पाचही जणांना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गावठी अळंबी खाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा - family
आडोशी गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांना गावठी अळंबी खाल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. या पाचही जणांना खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गावठी अळंबी खाल्याने विषबाधा
आडोशी आदिवासी वाडीवर रघुनाथ वाघमारे हे आपली पत्नी व तीन मुलांसह राहत आहेत. काल 20 जुलै रोजी रात्रीच्या जेवणासाठी जंगलात व शेताच्या बांधावर तयार होणारी गावठी अळंबी भाजीसाठी आणली होती. रात्री जेवणातून अळंबी भाजी खाल्यानंतर काही वेळाने सर्वांना उलट्या होऊ लागल्या.
आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना ही घटना कळल्यानंतर वाघमारे कुटुंबाला तातडीने खोपोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.