पनवेल- शेती आणि बांधकाम व्यवसायात गरिबांना लुटणाऱ्या माफियांना माफी नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळेबाजांना दिला आहे. 2014 पूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफियांची लूटमार मोठ्या प्रमाणात होत होती. त्या सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. त्याचे पडलेले डाग आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धुऊन काढता आले नाहीत, अशी टीकाही मोदी यांनी यावेळी केली. ते खारघरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
डोंबिवली, ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि पेणच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खारघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल पार्कजवळच्या मोठ्या मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी काही निवडक मुद्द्यांवरच भाष्य केले. यावेळी मासेमारी करणाऱ्यांसाठी नव्या योजना सुरू करणार असल्याचे मोदींनी सांगितले.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा 'जबरा फॅन' : म्हणतो, ते माझे राम मी त्यांचा हनुमान !