महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2020, 6:56 PM IST

ETV Bharat / state

मुरुडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

नारायण पाके, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज (सोमवारी) पाकेला अलिबाग न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Physical abuse of a minor girl
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रायगड - मुरुड तालुक्यातीळ एकदरामध्ये एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण पाके, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज (सोमवारी) पाकेला अलिबाग न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नारायण पाके हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्ता आहे. या प्रकारामुळे मुरुडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत 'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, नारायण पाके याचा मुरुडमधील डोंगरी येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर गावातील एक व्यक्ती कामावर आहे. हे कुटुंब त्याच्या सात वर्षीय मुलीसोबत तेथे राहत आहे. कामावर ठेवलेला व्यक्ती कामावर गेल्यानंतर पाके हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असे. पाके याचे हे कृत्य एका मुलाने मोबाईलमध्ये चित्रित केले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुरुड पोलिसांनी नारायण पाके याच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details