महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल-वसई मार्गावर लोकलच्या 170 फेऱ्या लवकरच - पनवेल-वसई मार्गावर लोकल धावणार

सध्या पनवेल ते वसई या मार्गावर मेमू गाडी चालते. पनवेल ते वसई हे अंतर पार करायला मेमू गाडी दीड तास घेते आणि एकूण 11 स्थानकांच्या दरम्यान ही धावते. यात कळंबोली, नावडे रोड, तळोजा, निळजे, दातीवली, कोपर, भिवंडी रोड, खारबाव, जूचंद्र अशी महत्त्वाची स्थानके आहेत. बाहेर गावावरुन येणाऱ्या काही रेल्वेही या स्थानकांवर थांबतात.

मुंबई लोकल रेल्वे न्यूज

By

Published : Nov 18, 2019, 5:49 PM IST

Updated : Nov 18, 2019, 7:09 PM IST

रायगड- लवकरच पनवेल ते वसई मार्गावर 170 लोकल ट्रेन धावण्याची शक्यता आहे. नुकतंच मुंबई रेल विकास प्राधिकरणाने लोकल चालवण्यासंदर्भात फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला आहे. या मार्गावरील रेल्वे रुळांच्या उभारणीसाठी प्रस्ताव तयार करून तो मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकर या मार्गावर एकूण 170 लोकल धावणार आहेत.

पनवेल-वसई मार्गावर लोकलच्या 170 फेऱ्या लवकरच

हेही वाचा -'पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्यासाठी आरबीआयने २ हजार कोटींची तरतूद करावी'

सध्या पनवेल ते वसई या मार्गावर मेमू गाडी चालते. पनवेल ते वसई हे अंतर पार करायला मेमू गाडी दीड तास घेते आणि एकूण 11 स्थानकांच्या दरम्यान ही धावते. यात कळंबोली, नावडे रोड, तळोजा, निळजे, दातीवली, कोपर, भिवंडी रोड, खारबाव, जूचंद्र अशी महत्त्वाची स्थानके आहेत. बाहेर गावावरुन येणाऱ्या काही रेल्वेही या स्थानकांवर थांबतात.

पनवेल ते वसईदरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन उभी करण्याची एमआरव्हीसीची योजना आहे. महत्त्वाचे म्हणजे पनवेल-वसई आणि दिवा मार्गावर लोकल मार्ग बांधण्याची चर्चा २०१२ पासून सुरू होती. या मार्गावरील झपाट्याने होत असलेले नागरीकरण, लोकल सेवा सुरू करण्यासाठी अनेक पडताळणी, अहवाल या सगळ्या टप्प्यातून गेल्यानंतर अखेर आता पनवेलवरून वसईला लोकलने जाण्यासाठीचा मार्ग सुकर होणार आहे.

हेही वाचा -शिवसेना मेट्रो तीन प्रकल्पाविरोधात आक्रमक, कार्यकर्त्यांनी केली ट्रकची तोडफोड

पनवेल ते वसई या ६३ किमी मार्गाच्या चौपदरीकरणावर सात हजार ८७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. लोकलच्या दररोज १७० फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ९८० कोटींचा आराखडा एमआरव्हीसीने तयार केला आहे. प्रत्यक्ष प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतरही त्यात जमीन संपादनासह अनेक समस्या उद्‍भवण्याचा दावा केला जात आहे. महामंडळास ६२ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे या मार्गातील जलवाहिन्या, भूमिगत जाळे आदींमधून मार्ग काढण्याचेही आव्हान राहणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षांत साडेचार लाख प्रवासी अपेक्षित धरण्यात आले आहेत.

या मार्गावर लोकल चालवल्यास त्याचा मोठा फायदा इथल्या वाढलेल्या लोकसंख्येला होऊ शकतो. मात्र, त्यासाठी अनेक बदल करावे लागणार आहेत. सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणे, प्लॅटफॉर्मची उंची, फलाट आणि लोकलमधील अंतर कमी करणे, अशी अनेक कामे हाती घ्यावी लागतील. एमआरव्हीसी याबाबत अभ्यास करून रेल्वे रुळांच्या उभारणीसाठी प्रस्ताव मध्य रेल्वेकडे दिलेला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गावर लोकल धावू शकेल.

पनवेल-वसई-विरार कॉरिडोरमध्ये एकूण २४ स्टेशन्स आहेत. यामध्ये सध्या याच मार्गावर असणाऱ्या १३ स्टेशन्सचा समावेश असेल. त्या व्यतिरिक्त आणखी नवीन ११ रेल्वे स्टेशन्सचा समावेश केला आहे.

Last Updated : Nov 18, 2019, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details