पनवेल (रायगड) - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विशेष उपाययोजना राबवल्या आहेत. तर अवैध धंद्यावरही कारवाई सुरू केली आहे. या दरम्यान पनवेल शहर परिसरात अवैधरित्या सुरू असेलली गावठी दारूची हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे.
पनवेलमध्ये गावठी हातभट्टी पोलिसांनी केली उद्ध्वस्त; तिघांना घेतले ताब्यात - हातभट्टी दारूची विक्री
पनवेल परिसरातील उसर्ली गावाजवळ बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबधित ठिकाणी छापा टाकला आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पनवेल शहर पोलिसांनी शुक्रवारी पनवेल ते पेणकडे जाणाऱ्या रेल्वेरुळाच्या कडेला असणाऱ्या उसर्ली गावाजवळ छापा टाकला. या कारवाईत त्यांनी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. भरत म्हात्रे (वय-40) भगवान जमादार (वय-42) व डान्सर छोटू राठोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पनवेल परिसरातील उसर्ली गावाजवळ बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबधित ठिकाणी छापा टाकून 28 हजार 150 रुपये किंमतीची दारू बनविण्याचे एकूण 810 लिटर कच्चे रसायन, प्लास्टिक ड्रम, पत्र्याचे डबे, गावठी दारू, दोन स्टोव्ह आणि इतर भांडी, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.