महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेलमधील बिबट्याचा 'तो' व्हायरल व्हिडिओ अफवाच - PETROL PUMP

पनवेल वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) ज्ञानेश्वर सोनावणे यांनी नागरिकांनी भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे, तसेच सदरची माहिती ही खोटी असल्याचे उघड झाले आहे.

पनवेल

By

Published : Aug 1, 2019, 3:23 PM IST

पनवेल- नांदगाव येथील पेट्रोल पंपावर 28 जुलैच्या रात्री दोन बिबटे आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर याची दखल वृत्तवाहिन्यांनी घेतल्याने नांदगावसह पनवेल तालुका भयभीत झाला होता. मात्र, याबाबत वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर सदरचा व्हिडिओ हा पनवेलचा नसून अन्य ठिकाणचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

पनवेलमधील बिबट्याचा 'तो' व्हायरल व्हिडिओ अफवाच

पनवेल वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) ज्ञानेश्वर सोनावणे यांनी नागरिकांनी भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे, तसेच सदरची माहिती ही खोटी असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत तालुक्यातील नांदगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाचे मालक कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरचा व्हिडिओ हा आपल्या पेट्रोल पंपावरील नसून अन्य दुसर्‍या जागेचा आहे. तसेच पनवेलमध्ये गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू असून या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपाची जागा ही पूर्ण सुकलेली म्हणजे उन्हाळ्यातील वातावरण दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आमचा पेट्रोल पंप 24 तास सुरू असतो. त्यामुळे याबाबत आमच्याकडे असणार्‍या कामगारांनासुद्धा तो दिसला असता, मात्र तसा तो दिसला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यावेळी आम्हाला ही बातमी कळली, त्यावेळी आम्ही संपूर्ण स्टाफला सोबत घेऊन घटनास्थळावर गेलो. त्यावेळी तेथील कामगारांसह त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, असा कोणताही प्रकार पनवेल तालुक्यात घडलेला समोर आलेला नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन ज्ञानेश्वर सोनावणे, वनविभाग, पनवेल

आमच्याकडे असा कोणताही प्रकार घडलेला नाही, आमचे कामगार 24 तास या ठिकाणी आळीपाळीने हजर असतात, तसेच बाहेरून हायवे रस्ता असल्यामुळे या ठिकाणी दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे हा व्हायरल झालेला व्हिडिओ अन्य कुठलातरी असल्याचे रिलायन्स पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विनय खुटले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details