महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यभरासह पनवेलमध्ये शोभायात्रा, लेझीम पथकांच्या निनादात गुढीपाडवा साजरा - गुढीपाडवा

येथील अनेक ठिकाणी गुढीपाडवा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांनी परिसराला पारंपरिकतेचे कोंदण आले होते. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा ही पनवेलकरांसाठी आकर्षक ठरली. या शोभायात्रेत महिलांनी अस्सल मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता. बहुतांश तरुण, तरुणी लेझीम व ढोल तालावर थिरकत होती. काहींनी तर हातात भगवे ध्वज हाती घेलते होते.

पनवेल

By

Published : Apr 7, 2019, 1:26 PM IST

Updated : Apr 7, 2019, 5:33 PM IST

पनवेल - येथील अनेक ठिकाणी गुढीपाडवा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांनी परिसराला पारंपरिकतेचे कोंदण आले होते. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने काढण्यात आलेली शोभायात्रा ही पनवेलकरांसाठी आकर्षक ठरली. या शोभायात्रेत महिलांनी अस्सल मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला होता. बहुतांश तरुण, तरुणी लेझीम व ढोल तालावर थिरकत होती. काहींनी तर हातात भगवे ध्वज हाती घेलते होते.

पनवेल

हिंदू नववर्षाचा पहिला सण गुढीपाडवा हा पनवेलमध्ये अगदी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी साडेसहा वाजल्यापासून गुढीपाडव्याची लगबग दिसून आली. नववर्ष स्वागत समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आपली मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्यात आली. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतल्या कसरती यांची ओळख करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सकाळी ७ वाजता गुढीपूजन करून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

यंदाच्या शोभायात्रेत निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळाले. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जनजागृती करण्याचे संदेशही जळकताना या शोभायात्रेत दिसून आले.
पनवेल मधील अनेक शाळांतील चिमुरड्यांनी तर निसर्ग, पर्यावरण, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील वेशभूषा परिधान करुन धमाल करत आपल्या मराठमोळ्या सणाचे महत्त्व जपण्याचा प्रयत्न केला. या शोभायात्रेत साहित्य परंपरा देखील जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने चिमुरड्यांनी दोन्ही साहित्यिकांची वेशभूषा परिधान करून लोकांना त्यांच्याबद्दल माहिती देत होते.

चौकाचौकात भल्या मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ही शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी करत असलेल्या प्रेक्षकांसाठी देखील मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रेक्षकांना नववर्षाचे स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 'चालता बोलता' या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलते करत केले.

पनवेलची ही शोभायात्रा पनवेलकरांच्या एकत्र येण्याचे आनंद साजरा करण्याचे नवे सांस्कृतिक निमित्त होऊन गेल आहे. दरवर्षीप्रमाणेच परंपरेचा मराठमोळा बाज यासारखाच असला तरी यंदा या परंपरेला विचारांची जोड मिळाल्याचे दिसून आले.

Last Updated : Apr 7, 2019, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details