महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे स्वागत करावे, पंकजा मुंडेंचे रायगडमध्ये आवाहन - pankaja munde news

व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्‍यांना अत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायाद्यांचे शेतकर्‍यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

pankaja munde on farm bills
शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे स्वागत करावे, पंकजा मुंडेंचे रायगडमध्ये आवाहन

By

Published : Dec 25, 2020, 3:51 PM IST

रायगड - व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्‍यांना अत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायाद्यांचे शेतकर्‍यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी शेतकर्‍यांना केले आहे. काँग्रेस राजवटीत सवाल विचारणे शक्य नव्हते, असेही त्या म्हणाल्या.

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे स्वागत करावे, पंकजा मुंडेंचे रायगडमध्ये आवाहन

शेतकरी संवाद परिषदेचे आयोजन

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संवाद अभियानात पंकजा मुंडे बोलत होत्या. आमदार रवीशेठ पाटील, भाजपा दक्षीण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सतीश लेले, जिल्हा चिटणीस मिलींद पाटील, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष हेमा मानकर, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, तालुका सरचिटणीस संतोष पाटील, कुर्डूसचे सरपंच अनंत पाटील, तालुका चिटणीस अमित पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायेत

देशातील शेतकरी कष्ट करत आहे. परंतु त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कोरोनाच्या काळात देखील आपल्या देशातील शेतकर्‍यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांच्या माल पडून राहता कामा नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. विविध योजना राबवत आहेत. या योजना लोकप्रिय होत आहेत. परंतु विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकर्‍यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी नपडता पंतप्रधांनांच्या योजानांचे व नवीन कायद्यांचे स्वगत करावे. या योजनांचा लाभ घेऊन देश आत्मनिर्भर कारावा, असे आवाहन मुंडे यांनी केलंय.

काँग्रेसच्या राजवटीत सवाल विचारणे शक्य नव्हते

काँग्रेसची सत्ता असताना शेतकर्‍यांसदर्भात काही कायदे झाले. परंतु तेव्हा विरोध केला नाही. काही लोकांनी असे कायदे करण्याच्या लेखी सूचना केल्या. तेच आता नवीन कायद्यांना विरोध करत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. काँग्रेस राजवटीत सवाल विचारणे शक्य नव्हते, असेही त्या म्हणाल्या.

शेतकरी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली

नवीन कायद्यामुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनमुळे 9 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे स्वतःला शेतकर्‍यांचे नेते म्हणवणार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच हे नेते आता नवीन कृषीकायद्यांना विरोध करत आहेत, असे भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details