महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवेळी पावसाने भातपीक धोक्यात; शेतकरी चिंताग्रस्त - raigad farmer news

पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली असुन हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

Paddy crop in danger in Raigad
रायगडातील भातपीक धोक्यात

By

Published : Oct 15, 2020, 1:18 PM IST

रायगड - पश्चिम बंगाल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भात पिके कोलमडून पडली असुन हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान 17 ऑक्टोबरपर्यत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे.

रायगडातील भातपीक धोक्यात
यावर्षी जिल्ह्यात 1 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातशेती लावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या चांगल्या पावसाने भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पीक येऊन हाताशी पैसेही मिळणार होते. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच वादळामुळे सुरू झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भात कापणीला सुरुवात करतात. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीक हे पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच 17 ऑक्टोबरपर्यत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
मराठवाड्यात सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान..
मराठवाड्यात यावेळी पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरवर्षी दुष्काळाने होरपळणारा शेतकरी यंदा अतिवृष्टीमुळे त्रस्त झाला आहे. मराठवाड्यातील कापूस, मका, सोयाबीनसारख्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details